कुर्हा । मुक्ताईनगर तालुक्यातील कुर्हा ग्रामपंचायत जिल्ह्यातील महत्वपुर्ण म्हणून ओळखल्या जाणारी ग्रामपंचायत महाराष्ट्र नेतृत्व करणारे अशी ओळख असलेले नेते मंडळी यांच सर्व लक्ष हे कुर्हा ग्रामपंचायतकडे लागले होते. उपसरपंच पदासाठी गुप्त पध्दतीने मतदान घेण्यात येऊन यात भाजपाचे पुंडलिक कपले यांचा एका मताच्या फरकाने विजय झाला. तालुक्यातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणार्या या ग्रामपंचायतीत भाजपाला सरपंचपद गमावून उपसरपंच पद मिळाल्याने दुधावरची तहान ताकावर भागवावी लागली.
लोकनियुक्त सरपंचांनी स्विकारला पदभार
ग्रामपंचायत कार्यालयात उपसरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली. लोकनियुक्त सरपंचपदी राष्ट्रवादीच्या सुनिता मानकर या निवडणुकीत विजयी झाल्या होत्या. जनतेला उत्सुकता होती ते उपसरपंच कोण होते त्याची उपसरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली सकाळी 9 ते 12 यावेळात नामनिदेर्शनपत्र दाखल करण्याची वेळ होती. 6 प्रभागातून 17 पैकी 11 भाजपा तीन राष्ट्रवादी, शिवसेना एक, कॉग्रेस, अपक्ष एक जागा मिळाली होती तसेच दोन्ही भाजपा प्रणित उपसरपंच पदासाठी अर्ज आले होते. पुंडलीक शंकर कपले व मनीष कमलकिशोर गोयनका यांच्यात थेट लढत झाली. निवडणुकीत जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये अध्यक्ष नवनिर्वाचीत सरपंच सुनिता विश्वनाथ मानकर ह्या होत्या तर निवडक अधिकारी चिंचोरे ग्रामसेवक होते. शिवसेनेचे नवनिर्वाचित सदस्य तेजराव पाटील यांनी गुप्त पद्धतीने घेण्यात सांगितले. यानंतर दुपारी 2 वाजता उपसरपंच पदासाठी मतदान घेण्यात आले त्यात पुंडलिक शंकर कपले यांचा एका मतानी विजय झाला त्यांना 9 मते पडली आणि मनीष गोयनका यांना 8 मते पडली. मतदान कुर्हा ग्रामपंचायत सभागृहात घेण्यात आले. भाजपाचे 25 ते 30 वर्षापासून जनतेच्या सहवासात राहणारे निष्ठावान कार्यकर्ते असलेले व पुंडलीक शंकर कपले यांना आज उपसरपंच पदाचा मान मिळाला. लोकनियुक्त सरपंच राष्ट्रवादीच्या सुनिता मानकर यांनी देखील पदभार स्विकारला.