कुर्‍हा गावातील व्यापार्‍याची 13 लाखात फसवणूक : गुजरातच्या एजंटाविरोधात गुन्हा

मुक्ताईनगर : तालुक्यातील कुर्‍हा गावातील धान्य खरेदी विक्री करणार्‍या व्यापार्‍याची गुजरातमधील अहमदाबाद येथील एजंटने 12 लाख 37 हजाराची फसवणूक केल्याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात त्या एजंटविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, एजंट दिनेश शहा (रा.अहमदाबाद) यास अटक करण्यात आली असून त्याच्याकडील चारचाकी जप्त करण्यात आली तर न्यायालयाने संशयीताला 22 पर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

फसवणूक प्रकरणी दाखल होता गुन्हा
कुर्हा येथे योगेश राधेश्याम चौधरी यांचे योगेश ट्रेडर्स नावाचे दुकान आहे. ते मका, तूर कुर्‍हा परीसरातील शेतकर्‍यांकडून घेवून खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात व जमा झालेले धान्य अकोला, खामगाव, गुजरात येथे पाठवत असतात. मूर्तिजापूर, जि.अकोला येथे योगेश चौधरी यांचे मामा योगेश अग्रवाल यांचे आडत दुकान आहे. त्यांनी गतवर्षी गुजरात येथील एजंट दिनेश शहा (रा.अहमदाबाद) यास माल विक्री केला होता. 31 जानेवारी रोजी दिनेश शहा हा दोन इसमांसह पांढर्‍या रंगाची हुंडाई व्हेरना गाडी (क्रमांक जी.जे 01 आर.डी. 1264) ने कुर्‍हा आर्ल्याीरीक्ष शहा याने चौधरी यांच्याकडून 2160 प्रती क्विंटल दराने 30 टन 820 किलो मका व 2270 प्रती क्विंटल दराने 25 टन 105 किलो मका मालवाहु गाडीने नेला होता. एजंट दिनेश शहा याने योगेश चौधरी यांना मालाचे पैसे बँक खात्यात टाकले असल्याचा मेसेज पाठवला होता. चौधरी यांनी बँक खात्यात तपासणी केली असता शहा कडुन पैसे मिळाले नसल्याची खात्री पटली.न ंतर चौधरी यांनी एजंट शहा याला भ्रमणध्वनी वरुन संपर्क केला असता त्याचा भ्रमणध्वनी बंद मिळुन येत होता.

फसवणूक प्रकरणी दाखल झाला गुन्हा
55 क्विंटल 925 किलो मका किंमत 12 लाख 37 हजार 136 रुपयांची फसवणूक झाल्याचे लक्ष्यात आल्यानंतर योगेश चौधरी यांच्या फिर्यादीवरुन पोलिसात एजंट दिनेश शहा (अहमदाबाद, गुजरात) याच्याविरूद्ध 7 फेब्रुवारीला फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल बोरकर व पोलिस पथकाने गुरुवार, 10 रोजी गुजरात राज्यातील अहमदाबाद येथून संशयीत दिनेश शहा याला चारचाकी वाहनासह ताब्यात घेतले. रविवार, 13 रोजी शहा याला मुक्ताईनगरात आणल्यानंतर सोमवार. 14 फेब्रुवारीला दिनेश शहा याला न्यायालयाने 22 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.