बोदवड- तालुक्यातील कुर्हा हरदो येथील 11 वर्षीय बालिकेचा विनयभंग केल्याप्रकरणी संशयीत आरोपी जयेश कडू उशीर (कुर्हा हरदो, ता.बोदवड) विरुद्ध बोदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यातआला. 11 रोजी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास आरोपीने विनयभंग केल्याचे तक्रारीत पीडीत बालिकेने म्हटले आहे. तपास उपनिरीक्षक बारकू जाने करीत आहेत.