भुसावळ – तालुक्यातील कुर्हेपानाचे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी रामलाल गोविंदा बडगुजर यांची निवड करण्यात आली. सुरेश शिंदे यांनी पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त पदासाठी शुक्रवारी निवडणूक झाली. बडगुजर यांना 17 पैकी 11 तर प्रतिस्पर्धी प्रमोद उंबरकर यांना सहा मते मिळाली. प्रसंगी तलाठी पाटील, ग्रामविकास अधिकारी झोपे उपस्थित होते. निकालानंतर फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करत जल्लोष करण्यात आला. तालुका पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सचिन खामगड, हवालदार हर्षवर्धन सपकाळे, तुषार पाटील यांनी बंदोबस्त राखला.