भुसावळ- तालुक्यातील कुर्हे पानाचे येथील प्रवीण जगन्नाथ कोळी (32, इंदिरा नगर, कुर्हेपानाचे) या युवकाने 14 रोजी आत्महत्या केली होती. या
युवकाच्या आत्महत्येप्रकरणी आरोपी कांतीलाल शांताराम सपकाळे, वर्षा कांतीलाल सपकाळे, सुशीलाबाई लोहार, भारतीबाई लोहार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. 14 रोजी प्रवीण मोबाईलवर बोलत असताना आरोपींनी मयत तु कुणाला शिव्या देत आहे असे म्हणत वाद घातला व त्यास शिवीगाळ करून लाकडी दांड्याने मारहाण करण्यात आली. या प्रकारानंतर प्रवीण याने घरात येत झोक्याच्या दोरीने गळफास घेतला. या प्रकरणी मंगला प्रवीण कोळी यांच्या फिर्यादीनुसार चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास तालुका ठाण्याचे उपनिरीक्षक सचिन खामगड करीत आहेत.