कुर्‍हे पानाचे गावातील तरुण बेपत्ता

0

भुसावळ- तालुक्यातील कुर्‍हे पानाचे येथील गणेश देवचंद कोळी (23) हा तरुण 23 सप्टेंबरपासून बेपत्ता झाल्याने तालुका पोलिसात राजू लालचंद कोळी यांच्या खबरीनुसार हरवल्याची नोंद करण्यात आली. गणेश हा 23 रोजी सायंकाळी सहा वाजता घरातून कुणालाही काही एक न सांगता निघून गेला. शरीर बांधा सडपातळ, उंची पाच फूट, रंग गोरा, नाक सरळ, अंगात नीळ्या रंगाची जीन्स, काळ्या रंगाचा टी शर्ट असे त्याचे वर्णन आहे. तो कुणाला आढळल्यास तालुका पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन नाईक राजेंद्र पवार यांनी केले आहे.