मुक्ताईनगर- तालुक्यातील कुर्हा येथील चिकन व्यावसायीकाचे दुकान फोडून चोरट्यांनी आठ हजारांच्या रोकडसह 12 कोंबड्या लांबवण्याची घटना 23 ते 24 ऑगस्टदरम्यान घडली. या प्रकरणी चिकन व्यावसायीक जबीर खॉ हरुण खॉ (36, कुर्हा) यांनी मुक्ताईनगर पोलिसात संशयीत आरोपी संतोष विष्णू रावळकर व सुरज धनंजय इंगळे (दोन्ही रा.कुर्हाकाकोडा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींनी दुकानाच्या मागील खिडकीचे गज कापून दुकानात प्रवेश करीत ड्रावरमधील आठ हजारांची रोकड, 500 रुपये किंमतीचा मोबाईल तसेच एक हजार 200 रुपये किंमतीच्या 12 कोंबड्या लांबवल्या. तपास पोलीस निरीक्षक अशोक कडलग यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुधाकर शेजोळे करीत आहेत.