कुर्‍ह्यासह मलकापूर भागातील चोरीस गेलेल्या दुचाकींचा लागला छडा

0

अल्पवयीन ताब्यात ; सात दुचाकी लांबवल्याची कबुली

मुक्ताईनगर- कुर्‍ह्यासह मलकापूर तालुक्यातून चोरीस गेलेल्या सात दुचाकी कुर्‍हा चौकीच्या पोलिसांनी शनिवारी जप्त केल्या. या प्रकरणी धामणगाव येथील अल्पवयीन संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याने चोरीची कबुली दिली आहे. या प्रकरणी जोंनधनखेडा येथील अजय साळुंके यांनी फिर्याद दिली होती. चिखलीच्या एका ढाब्यावरून त्यांची दुचाकी (क्र.एम.एच. 28 वाय.0295) 24 ऑक्टोबरला चोरीला गेल्यानंतर मुक्ताईनगर पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल झाला. त्यानंतर कुर्‍हा पोलीस चौकीचे हवालदार सुधाकर शेजोळे, शिपाई सुरेश पवार, भगवान पाटील, अनिल सोननी, मेजर कातरे, नीलेश श्रीनाथ यांनी तपास केला. धामणगाव येथील एका अल्पवयीनाने दुचाकी चोरल्याचे समोर आले. तसेच एकूण सात दुचाकी त्याने काढून दिल्या. सहा दुचाकी त्याने मलकापूर रेल्वे स्टेशन वरून चोरल्याची पोलिसांना कबुली दिली आहे.