जळगाव । पाकिस्तानात अटकेत असलेले भारतीय वंश कुलभूषण जाधव यांच्या फाशीला विरोध केल्यावर सुद्धा पाकिस्थानने फाशीची शिक्षा ठोठवल्या नंतर जळगाव येथील टॉवर चौकामध्ये निषेध म्हणून भारतीय जनता युवा मोर्चा जळगाव महानगरच्या वतीने पाकिस्थानाचा झेंडा जाळला आहे. यावेळी संपूर्ण परिसर पाकिस्थानाच्या निषेधार्थ घोषणांनी दणाणून सोडला गेला होता.
आंदोलनात यांचा होता सहभाग
यावेळी आमदार राजूमामा भोळे, नगरसेवक दीपक सूर्यवंशी, नगरसेवक सुनील माळी जितेंद्र मराठे, जयश्री पाटील, माजी मगरसेवक विजय गेही, किशोर चौधरी, विशाल त्रिपाठी, महिला आघाडीच्या जयश्री पाटील, महेश जोशी, भूपेश कुलकर्णी आनंद सपकाळे, नगरसेवक उज्वला बेंडाळे, राजू मराठे, राहुल वाघ, राजेंद्र पाटील, सुभाष शोचे, सरिता नेरकर, वंदना कळमकर, सना खान, निर्मला सपकाळे, संगीत निकम, उषा पाठक, जितू चौथे, राहुल पाटीर्लें रमेश मौर्य, रियाज शेख, वैभव चौधरी, विक्की पिंपरीया, योगेश बागडे, जयेश सोनगिरे, रितेश जाधव, योगेश कदम, भगसिंग निकम, अशोक राठी, पूनम खैरनार, राकेश ठाकूर, मयुरेश सोनार, चेतन बारी आदी उपस्थित होते.
मुर्दाबादचा नारा
भारत – पाकिस्तान मध्ये कुलभूषण जाधव यांच्या फाशी प्रकरणात वाद चव्हाट्यावर जाण्याची शक्यता असून सर्वच स्तरातून पाकिस्थानाच्या निर्णयाचा निषेध नोंदविण्यात येत आहे. भाजप च्या वतीने देखील पाकिस्थानाचा झेंडा जाळण्यात आल्या नंतर पाकिस्थान मुर्दाबादचा ! नारा देत संताप व्यक्त करण्यात आला आहे.
सोशल मीडियावर आगपाखड
भारत सरकारच्या वतीने कुलभूषण जाधव हे गुप्तहेर नसून ते भारतीय नागरिक असल्याची माहिती डोळ्यावर सुद्धा त्यांच्यावर पाकिस्थानात देशद्रोहाचा ठपका ठेवत फाशीची शिक्षा ठोवण्यात आली. भारताने जाधव यांच्या समर्थनात याबाबतचा प्रस्ताव दिल्यावर देखील पाकिस्थानची मुजोरी वाढत असल्याची आग पाखड सोशल मीडियावर होत आहे. सर्व स्तरावरून प्रत्येक भारतीयांसह जळगावकर कुलभूषण जाधव यांच्या फाशीची शिक्षा विरोधात ठाम आहे. पाकिस्थाना बद्दल सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे.
ठराव असुनही शिक्षा?
कुठलेही ठोस पुरावे नसताना कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली असून भारत पाकिस्थान मध्ये 1961 साली उभयतांमध्ये ठराव झाला दोघा देशा मधील कोणीही संशयित व्यक्ती आढळल्यास सामंजस्याने शहानिशा करून योग्य तो निर्णय घेण्यात यावा असा ठराव केला असताना देखील कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षे बाबत एकूण 13 वेळ प्रस्ताव पाठवलेला आहे. मात्र तो पाकिस्थान ने फेटाळला आहे. कोणत्याही प्रकारची चौकशी न करता फाशीची शिक्षा ठोठवण्यात आली आहे.