कुविख्यात दरोडेखोर बाजारपेठ पोलिसांच्या जाळ्यात

0

भुसावळ: दरोड्याच्या गुन्ह्यातील तब्बल दोन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणार्‍या कुविख्यात वसीमअली शब्बीरअली ईराणी उर्फ वसीम शमीम पटेल (19, रा.ईराणी वस्ती, ईराणी पाडा, संरधवा, जि.बडवाणी (मध्यप्रदेश, मूळ रहिवासी ईराणी गल्ली वॉर्ड नं.1, कोर्टासमोर, कॉलेज रोड श्रीरामपुर, जि.अहमदनगर) यास बाजारपेठ पोलिसांनी अटक केली. मुंबई नाका पोलिसांनी आरोपीस अटक केल्यानंतर त्याची नाशिक मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली होती. आरोपीविरुद्ध आतापर्यंत एकूण चोरी-दरोड्याचे 16 गुन्हे दाखल आहेत. भोसरी (पुणे) एमआयडीसी पोलिसांनी त्यास मोकादेखील लावला आहे. सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय आनंदसिंग पाटील, नाईक शंकर पाटील, नाईक प्रेमचंद सपकाळे, कॉन्स्टेबल विकास सातदिवे, कॉन्स्टेबल किरण बाविस्कर यांनी आरोपीस नाशिक कारागृहातून ताब्यात घेतले.