कुविख्यात मंगळसूत्र चोरट्यास पोलीस कोठडी

0

बाजारपेठ पोलिसांनी केली अटक ; चोरट्यास तक्रारदार महिलेने ओळखले ; अन्य गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता

भुसावळ– पादचारी महिलेचे मंगळसूत्र लांबवणार्‍या कुविख्यात शाकिर ऊर्फ गोलु रशीद शेख (20, रा.32 खोली,विवेकांनद शाळेजवळ, भुसावळ) यास बाजारपेठ पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्यास 3 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, आरोपीची 31 रोजी ओळख परेड घेण्यात आली.

कुविख्यात आरोपीविरुद्ध 11 गुन्हे
अटकेतील आरोपी शाकीर विरुद्ध तब्बल 11 वर गुन्हे दाखल असून त्याच्याविरुद्ध न्यायालयात सुनावणी सुरू आहे तर लोहमार्ग पोलिसांकडील गुन्ह्यात त्यास दोन वर्षांची शिक्षाही सुनावण्यात आली आहे. तक्रारदार रेखा गणेश राणे (लक्ष्मीनगर, भुसावळ) या 15 रोजी सायंकाळी साडेसहा वाजता घराजवळून पायी चालत असताना आरोपीने त्यांचे मंगळसूत्र लांबवले होते. सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल, पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील, नाईक सुनील थोरात, वकास सातदिवे यांनी त्यास अटक केली.