कुष्ठरोगाच्या समूळ उच्चाटनासाठी यंत्रणेला प्रतिसाद द्यावा

0

जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर

जळगाव – केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार, संपुर्ण राज्यात कुष्ठरोग शोध अभियान 2018-19 राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यात 24 सप्टेंबर, 2018 ते 9 ऑक्टोंबर, 2018 या कालावधीत कुष्ठरोग शोध अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात आरोग्य यंत्रणेचे कर्मचारी प्रत्यक्ष घरोघरी जाऊन सर्व्हेक्षण करणार असल्याने जिल्ह्यातून कुष्ठरोगाच्या समुळ उच्चाटनासाठी सर्व नागरिकांनी त्यांना तपासणीसाठी सकारात्मक प्रतिसाद द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी केले.

राष्ट्रीय कुष्ठरोग शोध अभियानाच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबीता कमलापूरकर, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण अधिकारी अनिता राठोड, सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ.चव्हाण आदी यावेळी उपस्थित होते. सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ.चव्हाण यांनी प्रास्ताविकात सांगितले की, जिल्ह्यातील 33 लाख 38 हजार 290 नागरीकांची व एकूण 6 लाख 78 हजार 867 घरांचे एकूण 14 दिवसात सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यासाठी ॲलर्ट इंडिया या संस्थेचे विशेष सहाय लाभत असल्याचेही त्यांनी सांगितले.