कुसुंबा गावातील तरुणाची गळफास घेवून आत्महत्या

जळगाव : 25 वर्षीय तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील कुसुंबा येथे रविवारी सकाळी उघडकीस आली. आत्महत्या करण्याचे कारण कळू शकले नाही. याबाबत एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. धनंजय चंद्रजित बाविस्कर (25, रा.धनवाडी, ता.चोपडा, ह.मु.कुसुंबा ता.जि.जळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे.

घरी कुणी नसताना केली आत्महत्या
एमआयडीसीतील ट्रान्सपोर्ट कंपनीत नोकरीस असलेला धनंजय बाविस्कर हा गेल्या दोन वर्षांपासून पत्नी उज्ज्वलासह वास्तव्यास होता. कुसुंबा येथेच धनंजयची बहिण शुभांगी आणि मेहुणे दीपक पाटील राहतात. अक्षयतृतीयेच्या निमित्ताने पत्नी उज्ज्वला माहेरी गेली असल्याने धनंजय हा घरी एकटाच होता. शनिवार, 23 एप्रिल रोजी रात्री 10 वाजता बहिण शुभांगीकडे धनंजयने जेवण केले व घरी निघून आला. मध्यरात्री धनंजयने रूमालाने गळफास घेवून आत्महत्या केली. रविवारी सकाळी 11 वाजले तरी धनंजय उठला नाही म्हणू शेजारच्यांना शंका आली. शुभांगी या घरी आल्यावर भावाने गळफास घेतल्याचे लक्षात आले. त्यांनी धनंजय यास तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांना मयत घोषीत केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास महेंद्र गायकवाड, नरसिंग पाडवी करीत आहे. शविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मयताच्या पश्चात पत्नी उज्वला, आई, वडील व बहिण असा परीवार आहे.