रावेर- तालुक्यातील कुसुंबा येथील प्रवीण किशोर भालेराव (22) याचा रेल्वे अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी दुपारी दोन वाजेपूर्वी घडली. या प्रकरणी रावेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. निंभोरा ते रावेर रेल्वे अपलाईनच्या 476 कमांकाच्या खांबाजवळ गाडी क्रमांक 11068 ही येत असतांना रेल्वे लाईन ओलांडतांना झालेल्या अपघातात कुसुंबा येथील प्रवीण किशोर भालेराव (22) या तरुणाचा मृत्यू झाला. या प्रकरणी रावेर स्टेशन मास्टर सी.एम.सोनवणे यांनी दिलेल्या खबरीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हवालदार जितेंद्र नारेकर करित आहेत.