कुसुंब्यात दोघांवर हल्ला : 12 संशयीतांविरोधात गुन्हा

Angry mob attack for trying to talk to girl : Case against 12 suspects in Kusumba रावेर : प्रेमविवाह केल्याच्या रागातून तालुक्यातील कुसुंब्यात तरुणावर झालेल्या हल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर दुसर्‍या गटानेही पोलिसात तक्रार दिली आहे. तरुणीशी बोलण्याचा प्रयत्न केल्यानंतर समोरील गटाने हल्ला केल्याने दोन जण जखमी झाल्याचा आरोप करीत 12 संशयीतांविरोधात रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. बुधवार, 5 रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

लाठ्या-काठ्यांचा सर्रास वापर
दुसर्‍या गटातर्फे नितीन राजू भालेराव (30, कुसुंबा खुर्द) यांनी तक्रार दिली असून फिर्यादीची आत्या मंगलाबाई यांची कन्या नम्रता ही घरासमोरून जात असताना तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केल्यानंतर संशयीत आरोपींना राग आला व त्यांनी लाठ्या-काठ्यांचा वापर करून मारहाण केल्याने तक्रारदारासह मंगलाबाई तायडे या जखमी झाल्या.

यांच्याविरोधात दाखल झाला गुन्हा
या प्रकरणी अतुल उत्तम भालेराव, उत्तम गोविंदा भालेराव, विनोद मधुकर भालेराव, कालू उत्तम भालेराव, अविनाश गौतम भालेराव, योगेश गौतम भालेराव, शारदाबाई उत्तम भालेराव, प्रदीप सपकाळे, वंदनाबाई (पूर्ण नाव नाही), रमाबाई वाघ, कौमाबाई गौतम भालेराव, ज्योतीबाई किशोर भालेराव (सर्व रा.कुसुंबा खुर्द) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार सतीश सानप करीत आहेत.