मुंबई । महाराष्ट्रचा कुस्तीपुटू व नुकताच उपअधीक्षक पदी रूजू झालेला नरसिंग यादव याला हरियाणाची शिल्पी शिवरान हिने पहिल्याच भेटी चिटपट केले होते. या दोघा कुस्तीपुटूंचा मुंबईजवळच्या मीरा-भाईंदर परिसरात नुकताच विवाह सोहळा पार पडला.हरियाणाची सॅफ गेम्स सुवर्णपदक विजेती कुस्तीपटू शिल्पी शिवरान हिने महाराष्ट्राचा कुस्तीपटू नरसिंग यादवला प्रथम भेटीच घायाळ केले होते.त्यावेळे यादवने शिल्पीला प्रपोज केले होते. शिल्पीने नरसिंगला त्यावेळी लगेचच होकार दिला नाही तर आपल्या कुटुंबियांसोबत चर्चा केली आणि त्यानंतर नरसिंगला होकार कळवला.
नरसिंग यादवचे वडील पंचम, भाऊ विनोद आणि तीन कोच शिल्पीला पाहण्यासाठी गेले होते त्याचवेळेस नरसिंग आणि शिप्ली यांचा साखरपूड्याची तारिख निश्चित करण्यात आली. त्यानंतर 9 नोव्हेंबर रोजी नरसिंग आणि शिल्पी यांचा साखरपूडा पार पडला. नरसिंग आणि शिल्पीचा विवाहसोहळा मुंबईनजिकच्या मीरा-भाईंदर परिसरात संपन्न झाला आहे.