कुस्त्यांमध्ये हनुमान व्यायमशाळेचे मल्ल ठरले मानकरी

0

वरणगाव। येथील हनुमान व्यायम शाळेच्या प्रशिस्त मंडळाने हनुमान जयंती व रामनवमी उत्सवाच्या निमित्ताने शहरात कुस्त्यांची आम दंगल नियोजन करण्यात आले होते. या कुस्त्यांमध्ये वरणगाव हनुमान व्यायमशाळेचे मल्ल मानकरी ठरले. तसेच या कार्यक्रमाचे उदघाटन माजी महसुलमंत्री एकनाथराव खडसे यांच्या हस्ते करण्यात आले. सालाबादप्रमाणे येथील हनुमान व्यायाम शाळेच्या अंतर्गत कुस्त्यांच्या आमदंगलीचे आयोजन महात्मा गांधी विद्यालयाच्या प्रांगणावर करण्यात आले होते.

यावेळी भुसावळ तालुक्याचे आमदार संजय सावकारे, सहकार मित्र चंद्रकांत बढे, सुनिल नेवे, उपनगराध्यक्ष शेख अखलाक, बोदवडचे सभापती निवृत्ती पाटील, नगरसेवक राजेंद्र चौधरी, तालुकाध्यक्ष सुधाकर जावळे, मिलिंद मेढे, सुकलाल धनगर, बबलू माळी, रवी सोनवणे, गणेश धनगर आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी हनुमान व्यायाम शाळा मंडळाचे अध्यक्ष सुनील काळे, उपाध्यक्ष शामराव धनगर, नामदेव मोरे, उत्तम पहेलवान, एकनाथ पहेलवान, ज्ञानेश्वर घाटोळे आदींनी परिश्रम घेतले. पंच म्हणून इस्माईल पहेलवान, दिलीप पहेलवान यांनी काम पाहिले. यावेळी वरणगाव पोलिसांतर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. हजारो प्रेक्षकांनी कुस्त्यांचा आनंद घेतला.

हजारोंचे बक्षिस
कुस्त्यांकरीता बर्‍हाणपूर, रावेर, जळगाव, जामनेर, चाळीसगाव आदी गावासह जिल्हाभरातून पहेलवान आपला हुनर आजमावण्यासाठी आले होते तर शहरातील पहेलवान अक्षय माळी व गणेश भोई यांच्या कुस्त्या प्रभावी ठरल्या तर महेबुब पहेलवान बर्‍हाणपूर व रामा पहेलवान रावेर यांची कुस्ती प्रेक्षकांमध्ये आकर्षण ठरल्याने ही कुस्ती बरोबरीत सुटली. विजयी पहेलवांना हजारोंचे बक्षिस देण्यात आले.