जळगाव। राज्यभरात शेतकरी संपाचा सहावा दिवस उलटताना राज्यसरकारच्या वतीने कर्जमाफी बाबत कोणतीही लेखी घोषणा झालेली नाही. राज्यभर शेतकरी संपावर गेला.त्याचे पडसाद मराठवाडा,पच्छिम महाराष्ट्रात,विदर्भ याभागात मोठ्या प्रमाणात दिसून आले.मोठी नासधूस गेल्या सहा दिवसात शेतकरी मालाची करण्यात आली. मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षाने दहशत माजविण्यासाठी हाप्रयत्न असल्याचे सांगितले. जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मध्ये राज्यभरातील शेतकरी संपाचा कुठलाही परिणाम नसल्याची माहिती बाजार समिती सभापती आणि संचालक यांनी दिली आहे. शेतकर्याकडे भाजीपाला नसल्याने आवक घटली मात्र धान्यबाजारचा सुरळीत पणे व्यवहार सुरु असल्याचा दावा बाजार समिती पदाधिकार्याच्या वतीने केला आहे.
शेतकर्यानी फिरवली पाठ
कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये भाजीपाला लिलावावर मोठा परिणाम झाल्याचे दिसून आले. शेतकर्यानी संपाला पाठींबा देत बाजार समितीमध्ये बाजीपाला विक्री करण्यासाठी पाठफिरवली आहे. यामुळे बाजार समितीवर आर्थिक परिणाम झाला आहे. शेतकर्याचा भाजीपाला बाजार समितीमध्ये दाखल झाला नसल्याने बाजारपेठ देखील सुनाट पडली आहे. किरकोळ विक्री वर देखील परिणाम झाला आहे. यामुळे नागरिकांना भाजीपाला खरेदी करण्यास अडचण निर्माण झाली आहे.
शेतकरी संपाचा काहीच परिणाम नाही. शेतकर्याची आवक चांगली आहे. वरच्या वर्गाने राजकीय संप केला यामध्ये शेतकर्याचा काहीएक सबंध नाही. शेतकर्याने शेतीला काढलेले उत्पन्नाचा फायदा कसा होईल हा प्रयत्न असतो. शेतकरी संपावर जाने अशक्य असून सर्व राजकीय खेळी आहे.
प्रभाकर पवार – संचालक, कृउबा, जळगाव
कृषी उत्पन्न बाजार समितीवर शेतकरी संपाचा थोडाही फक पडलेला नाही. जिल्ह्यात कोणताही परिणाम बंद मुळे झालेला नसून बाजार समिती मधील धान्य बाजार सुरळीत आहे. शेतकर्याकडे भाजीपाला कमी असल्याने आवक कमी झाली आहे. संपाची धार जिल्ह्यात पाहिजे तितकी तीव्र नाही.कर्ज माफी झाली पाहिजे.जिल्हा बँकेने गेल्या काळात शेतकर्यान कर्ज दिले मात्र अनेक अडचणी आल्याने शेतकरी संकटात सापडला यामुळे कर्ज फेडी मध्ये अडचणी निर्माण झाल्या, कर्जफेड करणार्या शेतकर्याला देखील कर्जमाफी देताना शेतकर्याना समान न्याय दिला गेला पाहिजे. अशी घोषणा सरकारने करणे गरजेचे आहे. जेणे करून कर्जफेड करणार्या शेतकरी कर्जफेड करतील. अन्यथा जिल्हा बँकेला शेतकरी कुलूप लावतील. तर जिल्हा बँक जिवंत राहणार नाही.
प्रकाश नारखेडे – सभापती, कृउबा, जळगाव
पिककर्ज नाही
अनेक अडचणी आल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणावर संकटात सापडला असून जिल्हा बँकेने अद्याप पर्यत पूर्णपणे पिककर्ज पुरवठा केलेला नाही. बँकेत पडून असलेल्या जुन्या नोटा रिझर्वबँकेने स्वीकारलेल्या नाही. नाबार्डकडे जिल्हा बँकेने पैसे घेण्यासाठी पाठपुरावा केल्याची माहिती माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी दिली होती. मात्र नाबार्डकडून आता पर्यत कर्जवितरणाच्या हालचाली झाली नसल्याचे जिल्हाबँक सूत्रांनी दिलेल्या माहितीमध्ये समोर आले आहे. राष्ट्रीयकृत बँकेत पैशे असताना आर्थिक पुरवठा वेळेवर होत नसल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात समोर येत आहे. सरकारने राज्यात कर्जमाफी केल्यास कर्जभरणार्यासह सगळ्या शेतकर्याना याचा फायदा व्हावा याबाबत सरकारने अशी घोषणा करावी. त्यामुळे जिल्हाबँकेच्या वसुलीमध्ये वाढ शक्य आहे. असल्याचे मत शेतकरी आंदोलनी व्यक्त केले आहे.