कृउबातील व्यवहार पुनश्‍च सुरळीत

0

शहादा । शहादा मार्केट मधील 8 व्यापार्‍यांचे परवाने त्यांना बहाल करणार असून सचिवावर दबाव टाकून परवाने रद्द करणे ही दुदैवी बाब आहे. सभापती व संचालक मंडळाच्या सहम्मतीने व्यापार्‍यांना परवाने दिले जातील, मार्केट पूर्वीप्रमाणे सुरु होणार आहे, असे प्रतिपादन सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दिपक पाटील यांनी केले. शहादा बाजार समितीत 15 दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी आंदोलनमुळे बंद असल्यामुळे किसान मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी नगराध्यक्ष मोतीलाल पाटील, पं.स.सभापती दरबारसिंग पवार, कृषी सभापती सुनिल पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष डॉ.किशोर पाटील, सेना जिल्हाउपप्रमूख धनराज पाटील, रिपाई जिल्हाध्यक्ष अरविंद कुवर, अनिल भामरे, सुनिल पाटील, दिलीप गांगुर्डे, बापूजी जगदेव, राजाराम पाटील, रोहिदास पाटील, उध्दव पाटील, माधव पाटील आदी उपस्थित होते.

हमीभावासाठीचा एकत्रित लढा
नगराध्यक्ष मोतीलाल पाटील म्हणाले की, मतभेद विसरून विषय चर्चेने सुटतात. कारण नसतानाही शेतकर्‍यांना लाठीचा मार खावा लागला. ही दुर्दैवी बाब आहे. हमीभावासाठी प्रत्येक पक्ष लढत आहे, सचिवा वर दबाब टाकून 8 व्यापार्‍यांचे परवाने रद्द केले. चुकिचा निर्णय प्रशासनाने घेतला. रद्द केलेले परवाने संचालक मंडळाने पुर्नविचार करुन पुन्हा व्यापार्‍यांना दिले पाहिजे, मार्केट सुरु झाले पाहिजे. तर दिपक पाटील सांगितले की, शेतकर्‍यांच्या नावावर संघटना राजकारण करित असून शेतकर्‍यांचे हिताचे त्यांना काहीच पडले नाही. आंदोलन करण्यामागे त्याचे परिणामाचा विचार केला पहिजे होता. शेतकरी व व्यापारी या आंदोलनामुले अडचणीत आला. कोणी शहादा बंद करण्यास भाग पाडतात. ही दुदवी बाब आहे आजपर्यंत शेतकर्‍यांचे कुठेच नुकसान केले नाही. शेतकर्‍यांसाठी 42 लिफ्ट सुरु केल्या आहेत. मार्केट सुरु करणार असून शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडणार नाही. कारखान्याने शेवटच्या शेतकर्‍याचा ऊस तोड केला. व्यापार्‍यांचे परवाने त्यांना बहाल करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

शेतकर्‍यांना वाली नाही
शेतकर्‍यांचा माल घरात पडून आहे. दीपक पाटील शेतकर्‍याच्या विरोधी राहिले असते तर शेतकर्‍यांचा ऊस शासनाने ठरून दिलेल्या भावापेक्षा ऊस जास्त दराने घेत नसता. मार्केट मध्ये हमी भाव पुरते माल घेतला जात नाही इतर ही गहू, मका, मुग सारखे पिकेही मोठ्या प्रमाणात मार्केट घेतले जात असल्याचे प्राचार्य मकरंद पाटील यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले. तर डॉ.किशोर पाटील म्हणाले की, हमीभावाचे ही काही निकष आहेत. आंदोलन कर्त्यांना राजकारण करायचे होते. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष ईश्‍वर पाटील म्हणाले की, सरकार कोणाचेही असो शेतकरी विरोधी असते. शेतकर्‍यांचे वाली कोणोच नाही. आंदोलन करण्याची पध्दत असते. आंदोलन दाबण्याच्या प्रयत्न केला गेला. सुत्रसंचालन व आभार माजी नगरसेवक के.डी.पाटील यांनी मानले.