कृऊबास संचालकपदी रत्नाबाई महाजन

0

अमळनेर । येथील कृषी उत्पन्न बाजार समिती वर अमळनेर नगरपरिषद प्रतिनिधी संचालकपदी प्रभाग 17 चा नगरसेविका रत्नाबाई प्रकाश महाजन यांची निवड नगराध्यक्षा पुष्पलता साहेबराव पाटील यांनी सर्वानुमते घोषित केली. रत्नाबाई महाजन यांची मार्केट संचालक पदी निवड झाल्याबद्दल माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील, ललीताताई पाटील, अनिल भाईदास पाटील, रामभाऊ संदानशिव, विनोदभैया पाटील, जितेंद्र जैन, महेश कोठावदे, हेमंत पवार, शिरीष पाटील, विक्रांत पाटील, गोकुळ बोरसे, संजय कोंतिक पाटील, डि. एन. महाजन, भाईदास महाजन, कैलास महाजन, यांनी अभिनंदन केले आहे.