कृषक समाजाच्यावतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन

0

जळगाव। कृषीप्रधान देशात नेहमीच अस्मानी व सुल्तानी संकटाने ग्रस्त असलेल्या शेतकर्‍यांची आर्थिक परिस्थिती सुधारणेसाठी व त्यांचा सर्वांगीन विकास होण्याच्या दृष्टिने महाराष्ट्र राज्य भारत कृषक समाजाच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 30 सुत्री मागण्यांची सनद बाळासाहेब थोरात माजी मंत्री तसेच अध्यक्ष भारत कृषक समाज महाराष्ट्र चेअरमन डॉ. प्रकाश मानकर, उपाध्यक्ष डॉ. रमेश ठाकरे यांच्या उपस्थितीत देवून सकारात्मक चर्चा झाल्यावर ठोस कारवाई करून शेतकर्‍यांना जास्तीत जास्त न्याय देऊन त्यांना सन्मानाने जगण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याचे महाराष्ट्र राज्य कृषक समाज जळगावचे चेअरमन प्रकाश मानकर यांनी पत्रकार परीषदेत दिली.

अशा आहेत 30 सुत्री मागण्या
या 30 सुत्री मागण्यात सर्व शेतकर्‍यांचा सात बारा कोरा झाला पाहिजे. कोणताही लहान मोठा भेद न ठेवता वेतन आयोग कुटूंबातील सर्वांना देता मग शेतकर्‍यांत भेदभाव का या प्रमुख मागणीसह शेतीमालाला हमी भाव अधिक 50 टक्के नफा पिक विमा संबंधी आयात निर्यात धोरण, वन्य प्राण्यांमुळे होणारे नुकसान भरपाई, बेरोजगारांसाठी फळे, भाजीपाला, अन्नधान्य प्रक्रिया उद्योगासाठी प्रोत्साहनपर योजना, पिक कर्जाच्या मर्यादेत वाढ, सेंद्रिय शेतीसाठी प्रोत्साहन देवून रासायनिक खतांचा व फवार्‍यांचा वापर हळूहळू कमी करणे, ठिक ठिकाणी, गोडावून, कोल्ड स्टोरेज, विज पुरवठा सतत 12 करणे, गाव रस्ते, शेत रस्ते, गावातील शेत जमिनीची सरकारी मोजणी करणे व गावातील नद्या, नाले, रुंदीकरण, खोलीकरण, नद्या जोड प्रकल्प कृषी विद्यापीठ विभागाला शेतकर्‍यांसाठी टारगेट देणे, रोजगार हमी योजना शेतकर्‍यांच्या शेतात राबविणे, कृषी शिक्षणाचा शाळा कॉलेजमध्ये समावेश शिक्षक, आमदार, पदवीधर आमदार यांच्यासारखे शेतकरी आमदारही असावे. गरीब शेतकरी, शेतमजुरांंच्या मुलांना पदवी पर्यंतचे मोफत शिक्षण आणि रात्रंदिवस शेतात काम करून देशासाठी अन्नधान्याचे उत्पादन करणार्‍या शेतकर्‍यांना राष्ट्रीय सेवक घोषित करून मासिक 20 हजार रू. मानधन वगैरे महत्त्वाच्या मागण्या या 30 सुत्री कलमात असून लवकरात लवकर ठोस पाऊले उचलून न्याय देण्याचे काम शासनाने करावे, अन्यथा याबाबत जनयाचिका दाखल करून न्यायालयाकडून दाद मागणार असे भारत कृषी समाज महाराष्ट्रतर्फे थोरात साहेब, डॉ. मानकर, डॉ. ठाकरे यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.