कृषी विद्यापीठ धुळ्यातच व्हावे ; गोरेंनी घेतली ना.बागडेंची भेट

0

धुळे । कृषी विद्यापीठ धुळ्यातच व्हावे त्याचा निर्णय अधिवेशनात घ्यावा, यासह विद्यार्थ्यांच्या प्रलंबित प्रश्‍नांसाठी युवासेनेचे पंकज गोरे यांनी मुंबईत विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांची भेट घेतली. मुख्य सचिवांची भेट घेवून त्यांनाही मागण्यांचे निवेदन देणार असल्याचे पंकज गोरे यांनी म्हटले आहे. शासनाच्या कृषी विद्यापीठ विभाजनाच्या निर्णयानुसार नवे कृषी विद्यापीठ धुळे जिल्ह्याला द्यावे, अशी विद्यार्थ्यांची मागणी असून त्यासाठी लागणारे प्राथमिक घटक धुळ्यात उपलब्ध आहेत. कृषी महाविद्यालयाच्या जागेसह लायब्ररी, नर्सरी, प्रयोगशाळा यासह कार्यालय, संशोधन केंद्र, विद्यार्थी वसतीगृह याकरिताची जागाही आहे. त्यामुळे अधिवेशनात कृषी विद्यापीठाचा विषय घेवून विद्यार्थ्यांची मागणी पूर्ण करावी, असे गोरे यांनी ना. बागडे यांना सांगितले आहे. यावेळी संदीप मुळीक हे उपस्थित होते.