अमळनेर: केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने कायम शेतकरी हिताचे निर्णय घेतले आहेत. आता देखील कृषी विधेयक मंजूर करून शेतकऱ्यांना मोठा न्याय केंद्र सरकारने दिला आहे. मात्र राज्य सरकार या विधेयाकांची अंमलबजावणी राज्यात करणार नसल्याचे जाहीर करून स्थगन प्रस्ताव आणला आहे. परंतु हे शेतकरी विरोधी असून केंद्राने मंजूर केलेले विधेयक राज्यातही लागू करावे अशी मागणी करत भाजपतर्फे महाराष्ट्र सरकारचे निषेध करण्यात आले आहे. अमळनेर भाजपतर्फे राज्य सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात येऊन प्रांताधिकारी, तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील, माजी जि.प.सदस्य व्ही.आर.पाटील, शहराध्यक्ष उमेश वाल्हे, सरचिटणीस जिजाबराव पाटील, राकेश पाटील, विजय राजपूत, राहुल पाटील, कृउबा सभापती प्रफुल्ल पवार, माजी सभापती श्याम अहिरे, संचालक पराग पाटील, राहुल पाटील, निवास मोरे, शितल देशमुख, महेंद्र बोरसे, चंद्रकांत कंखरे, महेंद्र पाटील, गिरीश पाटील, दिलीप पाटील, तुळशीराम हटकर, संजय एकतारे, देवा लांडगे, भास्कर पाटील, गुलाब पाटील,
किसान मोर्चा जिजाबराव पाटील, मचिंदर पाटील, युवा मोर्चा योगीराज चव्हाण, पंकज भोई, दिपक पाटील, कल्पेश पाटील, घनश्याम पाटील, राकेश पाटील, सागर मोरे, समाधान पाटील, अभिषेक पाटील, शेखर कुलकर्णी, ओबीसी मोर्चा दिपक पाटील, बाळा पवार, सुमित हिंदुजा, सौरभ पाटील, निनाद जोशी, निखिल पाटील
उपस्थित होते.