कृषी विभागाकडून गहू व हरभरा बियाणे विक्रीस

0

पिंपळनेर । महाराष्ट्र शासनाच्या ग्राम बीजोत्पादन कार्यक्रमांतर्गत साक्री तालुका कृषी विभागाने शेतक-यांना हरभरा व गहूचे विविध जातींचे बियाणे वाजवी किंमतीत अनुदानावर उपलब्ध करून दिले आहेत. त्यासाठी शेतकर्‍यांना ऑनलाईन नाव नोंदणीसाठी 7/12, 8अ हे उतारे तसेच आधार कार्ड व बँक खाते पुस्तकाची झेरॉक्स या कागदपत्रांची आवश्यकता आहे. म्हणून शेतक-यांनी बियाणे घेण्यास येताना वरिल कागदपत्रे सोबत आणावीत असे तालुका कृषी विभागाकडून कळवण्यात आले आहे. पिंपळनेर मंडळातील एकूण 56 गावांसाठी 225 क्विंटल गहू व 20 क्विंटल हरभर्‍याचे बियाणे उपलब्ध करण्यात आले असून बियाणे उपलब्ध असेपर्यंत परमिट वाटप करण्यात येईल असे पिंपळनेर कृषी मंडळाधिकारी ए. व्ही. पवार यांनी कळवले आहे. बियाण्यांसाठी पिंपळनेर मंडळातील शेतकर्‍यांनी पिंपळनेर कृषी कार्यालयात संपुर्ण कागदपत्रांसह येऊन परमिट प्राप्त करावे. बियाणे पिंपळनेर येथील श्रीकृष्ण कृषी सेवा केंद्रावर ठेवण्यात आली आहेत.

गहू 20, 40 किलोच्या पॅकमध्ये उपलब्ध
गव्हाच्या बियाण्याच्या लोक-1, जी. डब्ल्यू-496 निवा-917 (तपोवन), एम.ए.सी.एस.-6222 व 6478, फुले नेत्रावती, एच.आय.-1544, राज-4037, यु.एस.-428 ह्या जातींचे बियाणे उपलब्ध असून हरभ-याचे विशाल, विजय, आय.सी.सी.व्ही. 37 हे बियाणे उपलब्ध आहेत. गहू 20 व 40 किलोच्या पॅकमध्ये असून हरभरा 10 व 20 किलोच्या पॅकिंगमध्ये आहे. बियाणे उपलब्धतेनुसार व उपलब्ध पॅकिंगनुसार दर आकारण्यात येणार असल्याचे कळवले आहे. गहू बियाणे 380 रू. (20 कि.) पासून 640 रू. (40 कि.) पर्यंत तर हरभरा 420 रू. (10 कि.) पासून 940 रू. (20 कि.) पर्यंत किंमत आहे. तरी गरजू शेतकर्‍यांनी योजनेचा लाभ घ्यावा असे तालुका कृषी विभागाकडून कळवण्यात आले आहे.