* आमदार उन्मेष पाटील यांचे प्रतिपादन
* कृषी विभागाच्या अनुदान सोडत कार्यक्रम
चाळीसगाव । तालुक्याच्या कृषी विभागाने समृध्द शेती उन्नत शेतकरी अभियानाचा पुरेपूर लाभ शेतकर्यांना दिला असून यांत्रिकीकरण अंतर्गत ट्रँकर, टिलर, कांदा चाळ, शेडनेट गाय गोठा, सामूहिक शेततळे, अस्तरीकरण यासह शासनाचे विविध लाभ शेतकर्यांना पारदर्शक पणे मिळवून दिले आहेत. यातून तालुक्याचा मागील काही वर्षांपासूनचा वंचित शेतकरी बांधवाना घरपोच लाभ मिळवून देण्यात आला. त्यामुळे माझा शेतकरी बांधव आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून आर्थिक स्वयंपूर्ण होणार आहे. कृषी विभागाचे सर्वाधिक लाभ देण्यात उत्तर महाराष्ट्रमध्ये चाळीसगाव अग्रेसर असल्याचा माझ्यासह शेतकरी बांधवाना अभिमान आहे, असे प्रतिपादन यावेळी आमदार उन्मेषदादा पाटील यांनी व्यक्त केले.
ट्रक्टर व कांदाचाळ, शेडनेट सोडत
तालुक्यातील यंदा च्या आर्थिक वर्ष्यासाठी द्यावयाच्या ट्रॅकटर, कांदाचाळ ,शेडनेट , पॉलिहाऊस, सामूहिक शेततळे अनुदान, व अस्तिरिकरण लाभधारकांच्या सोडतीचे आयोजन आज गणेश मंगल कार्यालयात कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले होते दुपारी बारा वाजता सुरू झालेली ही सर्व प्रकारच्या अनुदान सोडतीला सुरुवात करण्यात आली होती. कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा तालुक्याचे आमदार उन्मेष पाटील यांच्या उपस्थितीत तर जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती पोपट तात्या भोळे याची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी व्यासपीठावर पंचायत समितीचे उपसभापती संजय पाटील, पं.स. सदस्य दिनेश बोरसे, पं.स.सदस्य सुनील पाटील भोरस, सुभाष पाटील भामरेकर, तालुका कृषी अधिकारी ए.जे.येवले, उपविभागीय कृषी कार्यालयाचे प्रतिनिधी यू.आर.जाधव, श्री नरवाडे, तज्ञ मार्गदर्शक डॉ.हेमंत बाहेती, संदीप मराठे हवं उपस्थित होते. सुमारे सात तास चाललेल्या या सोडतीला शेकडो शेतकरी उपस्थित होते.
1440 लाभार्थीना मिळाला लाभ
कृषी विभागाच्या या चालू आर्थिक वर्ष्या करिता अडीच ते तीन हजार शेतकर्यांनी या सोडतीसाठी अर्ज सादर केले होते त्यापैकी आज वरील सर्व प्रकारच्या लाभांसाठी सोडत आयोजित करण्यात आली होती त्यात कांदाचाळीच्या 87 हजारांच्या अनुदानासाठी दोन हजार अर्जापैकी जनरल साठी 1140, अनुसूचित जाती साठी 45, अनुसूचित जमाती साठी 10असे प्रतीक्षा लाभधारक यांची सोडत संपन्न झाली या कांदाचाळ साठी दोन लाख खर्च येतो तशी बिले सादर केल्यावर अनुदान खात्यात जमा होते तर सामुदायिक शेततळेसाठी 3.25 लाख अनुदानासाठी सर्वच्या सर्व तेहतीस लाभधारक पात्र ठरले अस्तरीकरण साठी 156 तर यांत्रिकीकरण अंतर्गत 20 बीएचपीचे ओपनसाठी 1 लाख तर राखीव गटातील शेतकर्यांसाठी 1.25 लाख अनुदान दिले जाते. याकरिता यंदा 55 शेतकर्यांना हा लाभ मिळणार आहे. या सर्व लाभधारकांच्या प्रतीक्षा यादीतून अनुक्रमानुसार निधी उपलब्ध होताच वाटप करून दिली जाईल यावेळी आमदार उन्मेष पाटील व जिप सभापती पोपट भोळे यांच्या हस्ते शिंदीच्या शेतकरी मीराबाई आप्पा दौंड यांना मिनी ट्रॅकटरचे वाटप करण्यात आले
शेतकरी गटाचा मिनी लॅब देऊन सत्कार
यावेळी पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जन्मदिन हा शेतकरी दिनाच्या निमित्ताने शेतकरी गटांचा आमदार उन्मेष पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यात पिंप्री येथील साई कृपा गटाचे अध्यक्ष सुभाष पाटील , अष्टविनायक गट तरवाडे अध्यक्ष डॉ तुळशीराम मराठे , सतिमाई गट पिलखोड ज्ञानेश्वर पाटील तसेच डोनदीगर कृषी रत्न रेशीम गटाचे अध्यक्ष गोरख पाटील यांच्या गटांना एक लाख रुपयांचे माती परीक्षण मिनी लॅब साहित्य देऊन गौरविण्यात आले
बोन्डअळी निर्मूलन व्यवस्थापन कार्यशाळा
या वेळी ममुराबाद कृषी विज्ञान केंद्र चे बोन्डअळी निर्मूलन तद्य डॉ हेमंत बाहेती यांनी शेतकर्यांना मार्गदर्शन केले तर बायर सिडचे संदीप मराठे यांनी औषध फवारणी पद्धतीचे प्रात्यक्षिक करून दाखवले सोडतीच्या कार्यक्रम सुमारे सात तास चालला यावेळी कृषी विभागाच्या अविनाश चंदेले, धनंजय पाटील, सिद्धार्थ कापुरे, सी.एच. असरवार, अर्जंन वाघ, एस.व्ही. सूर्यवंशी, महेश फावडे, अतुल चव्हाण, संजय चव्हाण, धर्मराज वारे, समाधान सोनवणे, श्रीमती सुजाता सरदार, सुनीता गोरे, रेणुका पाटील यांनी ही सोडत पार पाडली.