मुक्ताईनगर प्रतिनिधी…..
कृषी विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक नाशिक विभाग नाशिक मोहन वाघ यांनी 14 सप्टेंबर रोजी पोळ्याच्या सना निमित्त मुक्ताईनगर तालुक्यातील चांगदेव शिवारात भेट दिली व शेतकऱ्यानं बरोबर बैलपोळा साजरा केला. क्षेत्रीय दौऱ्या दरम्यान त्यांनी गावातील शेतकऱ्यांशी हितगुज साधली व कृषी विभागाच्या कामांची पाहणी केली. सहसंचालक मोहन वाघ यांनी कृषी विभागामार्फत अनुदानित ट्रॅक्टर व औजरांची तपासणी केली व चांगदेव मधील गुरुकृपा अग्रो प्रोडूसर कंपनी याला भेट देऊन त्यांच्या अवजार बँकेची पाहणी केली. या भेटीदरम्यान त्यांनी चांगदेव गावातील कृषी सेवा केंद्राची देखील तपासणी केली. भेटीच्या वेळी तालुका कृषी अधिकारी अभिनव माळी, मंडळ कृषी अधिकारी रवी जाधव , कृषी पर्यवेक्षक किरण महाजन, कृषी सहाय्यक संदीप पाटील तसेच कृषी विभागातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.