कृष्ण सुदाम्याप्रमाणे व्यवहार करा

0

उत्तर प्रदेश । भगवान कृष्णाने सुदाम्याला कॅशलेस मदत केली होती. मग आपण अशा पद्धतीचा वापर करायला काय हरकत आहे, अशा शब्दांमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लोकांना कॅशलेस व्यवहार करण्याचे आवाहन केले. पंतप्रधान मोदी यांनी नोटाबंदीनंतर कॅशलेस व्यवहार करण्याचे आवाहन देशवासीयांना केले होते. आता योगी आदित्यनाथ यांनी कॅशलेस व्यवहार करण्याचे आवाहन करताना कृष्ण आणि सुदाम्याच्या मैत्रीचा संदर्भ दिला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कॅशलेस व्यवहार करण्याचे आवाहन करताना कृष्ण आणि सुदाम्याच्या मैत्रीचा पौराणिक संदर्भ दिला. ‘लोकांनी कृष्ण आणि सुदाम्याकडून प्रेरणा घेत कॅशलेस व्यवहार करावेत,’ असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले. ‘कॅशलेस व्यवहार पूर्वीपासून प्रचलित आहेत. कृष्णाने सुदाम्याला केलेली मदत ही कॅशलेस पद्धतीनेच करण्यात आली होती.

71 जिल्ह्यांना एक सारखाच वीज पुरवठा
‘उत्तर प्रदेशमधील सर्वच्या सर्व 71 जिल्ह्यांना एक सारखाच वीज पुरवठा करण्यात येईल. वीज चोरीला पायबंद घालण्याचे प्रयत्न केले जात आहेत. वीज चोरी थांबल्यावर वीज पुरवठ्याची समस्या संपुष्टात येईल. वीज पुरवठा करताना आधी व्हीआयपी संस्कृती पाळली जायची. मात्र आता वीज पुरवठ्यातील व्हीआयपी संस्कृतीदेखील संपुष्टात आणण्यात येईल. पंतप्रधान मोदींनी देशाला स्वच्छतेचा मंत्र दिला आहे. यानुसार कृती करुन स्वच्छतेकडे पूर्ण लक्ष केंद्रित करण्यात येईल. पंतप्रधान मोदींचे लक्ष ग्राम पंचायतींवर आहे. त्यांची स्वप्ने आम्ही पूर्ण करु’ असेदेखील योगी आदित्यनाथ यांनी म्हटले.