कॅथलिक जिमखान्याला विजेतेपद

0

मुंबई। कर्णधार डेरेक सिप्पी, मेल्वीन मस्कॅरेहन्स आणि कार्ल सेरॉवने सुसुत्रबद्ध खेळ करत सीजी डेकापीटर संघाला चेंबुर जिमखाना आयोजित बिलीयर्डस लीग स्पर्धेचे विजेतेपद मिळवून दिले. अंतिम फेरीत कॅथलिक जिमखान्याच्या या संघाने माटुंगा जिमखान्याच्या एमजी पार्टीसिंपंट्स संघावर 608-503 असा विजय मिळवला.

त्याआधी झालेल्या लढतींमध्ये देवेंद्र जोशीने मेल्वीनचा 200-88 असा पराभव करत माटुंगा जिमखान्याला आघाडी मिळवून दिली होती. पण दुसर्‍या लढतीत डेरेक सिप्पीने शैलेश रावचा 200-191 असा पराभव करत कॅथलिक जिमखान्याला सामन्यात बरोबरी साधून दिली. निर्णायक लढतीत कार्लने संयमी खेळ करत 200- 127 असा पराभव करत संघाच्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. या यशाबद्दल कॅथलिक जिमखान्याला 50 हजार रुपयांचा रोख पुरस्कार आणि विजेतेपदाचा चषक देऊन गौरवण्यात आले. उपविजेत्या संघा 25 हजार रुपयांचा रोख पुरस्कार मिळाला.