कॅन्टोन्मेंट परिसरात सीसीटीव्हीची करडी नजर

0

खडकी : सामाजिक सुरक्षितता आणि अनुचित प्रकार व घटना संबंधीची खबरदारीच्या दृष्टीने खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाने एक पाऊल उचलले असून लवकरच संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला आहे.

नुकत्याच पार पडलेल्या कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सभेत हा प्रस्ताव मांडण्यात आला असून आठ ही वॉर्डातील सदस्य आपल्या परिसरात कोठे-कोठे कॅमेरे कार्यान्वित करायचे या संबधीची यादी देणार असून त्यानंतर सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार असल्याची माहिती कॅन्टोन्मेंटचे अधिकारी एस.व्ही. पाटील यांनी दिली.