ट्यूडर-एसएन नावाचे एक प्रोटीन आणि सीआरएसपीआर-सीए 9 हे जीन संपादन करणारे तंत्र यांच्या आधारे कॅन्सर रोखू शकण्याचा मार्ग वैज्ञानिकांनी शोधला आहे. रोचेस्टर विद्यापीठातील संशोधकांनी सायन्स जर्नल मध्ये प्रकाशित केलेल्या संशोधन लेखात या कॅन्सरवरील उपायाची चर्चा केलेली आहे. ट्यूडर-एसएन हे प्रोटीन सामान्य पेशींपेक्षा कॅन्सरग्रस्त पेशींमध्ये अधिक प्रमाणात असते.
नेमके हेच प्रोटीन वाढत्या कॅन्सर पेशींच्या संख्येला नियंत्रणात आणू शकते. प्राध्यापक रेयाद ए म्हणतात कॅन्सर क्लिष्ट आजार मानला जात असला तरी त्याचे सोपे कारण पेशींची अनियंत्रित वाढ हे आहे. सीआरएसपीआर-सीए 9चा उपयोग करून वैज्ञानिकांनी कॅन्सर पेशींमधून ट्यूडर-एसएन प्रोटीनला बाजुला काढले. हे प्रोटीन मायक्रोआरएनआयला नियंत्रित करते. त्यामुळे ज्या जीनमुळे पेशींची वाढ होते त्याला मायक्रोआरएनआय थांबवते. परीणामी पेशी विभाजन अतिशय संथ होते आणि कॅन्सरचे जे कारण पेशींची अमर्याद वाढ त्यावरच बंधन येते. वृक्क आणि घशाच्या कॅन्सरवर सध्याचे संशोधन लागू आहे. ते सर्व प्रकारच्या कॅन्सरवर उपाय ठरू शकते अशी आशा वैज्ञानिकांना आहे.