वडील रमेश बोयत हे चित्रपटसृष्टीत सहाय्यक कॅमेरामन व सह-कलाकार म्हणून करतात काम
संदीप बोयत यांनी जमविली 250 तिकिटे
देहुरोड : भारतीय चित्रपटसृष्टीला एक अनोखा आणि आनंददायक इतिहास आहे. हा इतिहास आजही अनेकांच्या स्मरणात आहे. इतिहासाचा सुवर्णकाळ अनेक नागरिक आपल्या विविध छंदांमधून जपत असतात. कुणी पोस्टर तर कुणी तिकिटे जपतात. कुणी चित्रफिती गोळा करतात. असाच देहुरोड येथील संदीप बोयत भारतीय चित्रपटीचा इतिहास आपल्या संग्रहातून मांडणारा चाहता आहे. आत्तापर्यंत 250 तिकिटे जमविली आहेत. संदीप हा तरुण चित्रपट निर्मिती क्षेत्रात कॅमेरामॅन म्हणून काम करतो. संदीपचे आजोबा रिसाला नंदू हे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आजाद हिंद सैन्यातील सदस्य होते. तर वडील रमेश बोयत हे चित्रपट सृष्टीत सहाय्यक कॅमेरामन व सह-कलाकार म्हणून काम करत यामुळे संदीपला आपल्या वडिलांकडूनच चित्रपटाबद्दल आवड निर्माण झाली.
हे देखील वाचा
250 तिकिटे जमविली
या ध्येयवेड्या संदीप बोयत यांनी आपला छंद जोपासताना 1947 पासून ते आत्तापर्यंत 250 तिकिटे जमविली आहेत. तर, जुन्या चित्रपटाच्या चित्रफिती व पोष्टर याचा मोठा संग्रह केला आहे. संदीप यांनी आपल्या या संग्रहातून संपुर्ण चित्रपटसृष्टीला उजाळा देत आहेत. संदीप यांच्या या कार्याची दखल इंडिया बुक ऑफ ‘रेकॉर्ड’ व लिमका ‘बुक’ने घेतली आहे. या कार्याचा गौरव लष्कर, चित्रपट संस्था, व अनेक नामवंत संस्थांनी केला आहे. संदीप आत्तापर्यंत अनेक कलाकारांना भेटला असून त्यांच्या आठवणी त्याने जपल्या आहेत. संदीप बोयत याच्याकडे हिंदी व दाक्षिणात्य चित्रपट अभिनेते मोतीलाल, नागेश, मेहमूद, आर. डी बर्मन, प्रेम नाझीर, उत्तमकुमार आदी सिनेअभिनेते व कलाकारांचे दुर्मिळ पोष्ट तिकीट असून अनेक जुन्या गाजलेल्या चित्रपटांची तिकीटे सुद्धा आहे. त्यात जीना तेरी गली में’, लाल दुपट्टा मलमल का’, हिमालय की गोद मे’, सूर संगीत’ आदी चित्रपटांचा समावेश आहे. तो राजकपूर आणि धमेंद्र यांचा चाहता असून त्यांना तो अनेकदा भेटला आहे. त्यांच्या स्वाक्षर्या, त्यांच्या सोबतचे फोटो याचा संग्रहसुद्धा संदीपने केला आहे.
इतिहास खुप मनोरंजक
आपल्या छंदाबद्दल बोलताना संदीप बायत म्हणाले की, ही आवड मला वडीलांकडून मला मिळाली आहे. त्यामुळे मला ही आवड निर्माण झाली आहे. भारतीय चित्रपटसृष्टीचा इतिहास हा खुप मनोरंजक आहे. जुने सिनेमे, त्यांची निर्मिती, त्या पाठीमागील कथा हे खूप सर्वांनी समजून घ्यावा असा आहे. नायक, नायिका, गायक, संगितकार यांचे चाहते आजही सापडतात. मी आजवर अनेक अभिनेत्यांना भेटलो आहे. मलाही अनेक अभिनेत्यांना भेटून त्यांना भेटणे खूप आवडते. मला सर्वांत जास्त आवडलेले अभिनेते म्हणजे धर्मेंद्र आहेत. ते माणूस म्हणून अद्वितीय आहेत. त्यांची भेट मला आजही तेवढीच आनंनदायी वाटते.