मुंबई। उत्कंठापूर्ण सामन्यात ठाण्याच्या इजाझ शेखने मुंबई शहर संघातील मोहम्मद साजीद खानचा पराभव करत जुहुविलेपार्ले जिमखाना आयोजित जोड जिल्हा कॅरम स्पर्धेच्या तिसर्या फेरीत प्रवेश केला. इजाझने स्पर्धेतील आव्हान कायम राखताना मोहम्मद साजीदवर 9-25, 25- 25, 25-22 असा निसटता विजय मिळवला. दुसर्या फेरीतील अन्य लढतीत निलेश परबने तिसर्या गेमपर्यंत लांबलेल्या सामन्यात राजेश मेहताचे स्पर्धेतील आव्हान 25-12, 0-25, 25-16 असे संपुष्टात आणले. पालघरच्या सचिन पवारने आगेकूच करताना बी व्हिक्टरचा 14-25, 25-19, 25-10 असा पराभव केला.
इतर लढतींमध्ये अव्वल मानाकंन मिळालेल्या रियाझ अकबर अली, आठवा मानांकित मोहम्मद गुफरान आणि सुहास पोमेंडकरने तिसर्या फेरीत स्थान मिळवले. रियाझने दुसर्या फेरूत प्रसन्न खदापकरचा 25-0, 25-0 असा सरळ पराभव केला. गुफराने सुरेश पंडीतचे आव्हान 25-6, 25-0 असे संपुष्टात आणले. तर सुहास पोमेंडकरने धनजंय खावरेवर 25-20, 25-9 असा विजय मिळवला.