जळगाव : सर्वसामान्य माणसांमध्ये नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, ई-कॉमर्स याबाबत जनजागृती करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना व एन.सी.सी.च्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन भिकू रामजी इदात यांनी केले आहे. मा.पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी केल्यानुसार उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने प्रकाशित केलेल्या ‘एक पाऊल : डिजीटल साक्षरतेकडे’ या पुस्तिकेचे प्रकाशन भिकू रामजी इदाते, अध्यक्ष, राष्ट्रीय विमुक्त जाती व भटक्या जमाती आयोग, भारत सरकार, नवी दिल्ली व कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांच्याहस्ते करण्यात आले.
‘एक पाऊल : डिजीटल साक्षरतेकडे’या पुस्तिकेचे प्रकाशन
बीसीयुडी संचालक प्रा.पी.पी.माहुलीकर, डॉ.बी.डी.कज्हाड, दिलीप पाटील, प्रा.सत्यजित साळवे, राष्ट्रीय विमुक्त जाती व भटक्या जमाती आयोग, भारत सरकार, नवी दिल्लीचे अधिकारी पुरण सिंग, डॉ.मनिष जोशी आदी उपस्थित होते. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने एक कृती कार्यक्रम तयार करुन ‘एक पाऊल डिजीटल साक्षरतेकडे’ अर्थात रोख विरहित अर्थव्यवस्था (कॅशलेस सोसायटी)या उपक्रमाची सुरुवात केली असून एका रासेयो स्वंयसेवकाने किमान दहा नागरिकांना मोबाईल बँकिंग व कॅशलेस सोसायटी संदर्भात हा कृती कार्यक्रम विद्यापीठ यशस्वी करीत आहे.
कृती कार्यक्रम पुस्तिकेचेही प्रकाशन
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा परिसर कॅशलेस करणे, पायथ्याशी असणारे टाकरखेडा हे गाव कॅशलेस व्हिलेज मिशनसाठी दत्तक घेणे, रासेयोच्या 15 हजार स्वयंसेवकांच्या मदतीने समाजात कॅशलेस सोसायटी बाबत जनजागृती व कृती कार्यक्रम घेणे, डिजीटल व्यवहाराच्या तपशीलवर प्रशिक्षणासाठी काही संस्थांकडून तांत्रिक सहकार्य घेणे, रासेयोच्या विविध शिबीरामध्ये दोन तासाचे प्रशिक्षण देणे, प्रत्येक महाविद्यालयातील रासेयोचे युनिट व इच्छुक प्राध्यापक /विद्यार्थी यांच्यासाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करणे, प्रत्येक विद्यार्थ्याला काही विद्यार्थ्यांच्या समुहांना डिजीटल व्यवहाराचे अज्ञान असणार्यांचा शोध घेवून लोकांना प्रशिक्षण देणे, डिजीटल व्यवहाराबाबत साक्षरता नसलेल्या भागांना शोधून त्या भागांवर विशेष लक्ष केंद्रीत करणे, कॅशलेस कॅम्पस् करणे यासह आर्थिक व्यवहार रोख विरहित करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या कृती कार्यक्रम पुस्तिकेचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.