जळगाव। जळगाव जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेकडून शेतकर्यांकडून कॅशलेस व्यवहाराला चालना मिळण्यासाठी आधुनिकतेकडे वाटचाल म्हणून बँकेच्या सभासदांसाठी देशातिल सर्वच राष्ट्रीय कृत बँकेत चालणारे किसान क्रेडिट कार्ड व डेबिट कार्डचे अनावरण करण्यात आले. येत्या काही दिवसात शेतकर्यांना कर्ज देण्याची बँकेची तयारी असून नवीन येणार्या सभासदांना देखील कर्ज वितरित करण्यात येणार असल्याची माहिती माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी पत्रकार परिषदे दरम्यान दिली आहे. अध्यक्षा अॅड. रोहिणी खडसे खेवलकर, उपाध्यक्ष आ. किशोर पाटील, संचालक आ. संजय सावकारे, खा. ए.टी.नाना पाटील, आ. राजूमामा भोळे, जि.प. उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, संजय पवार, नानासाहेब देशमुख, गणेश नेहेते, अमोल पाटील, वाडीलाल राठोड, एमडी जितेंद्र देशमुख उपस्थित होते.
500 कोटी बँकेकडे शिल्लक
नवीन तसेच जुन्या सभासदांना कर्ज वैरण करण्यात करण्यात येणार आहे. 1995 कोटी कर्ज असून 3 हजार कोटीची वाढ ठेवी मध्ये झाली आहे. गेल्या काळात ठेवी 2200 कोटी होत्या आता मात्र त्या 800 कोटी ने वाढल्या आहे. बेलगंगासह दोन साखर कारखानाचा व्यवहार सुरु आहे. शेतकर्यांच्या कॅशलेस व्यवहारासाठी पर्यटन सुरु आहे. 500 कोटी सध्या बँके जवळ शिल्लक असून शेतकर्यांना कर्जाच्या मध्यमातून देण्यात येणार आहे. 210 कोटी जुन्या नोटा जिल्हा बँकेत पडून आहे. ते अद्याप रिझर्व्ह बँकेने स्वीकारले नाही यासाठी राज्य, केंद्राशी बोलणे सुरु आहे. महाराष्ट्रात सर्वच बँकांची अडचण झाली असून यामुळे जिल्हा बँकेला आर्थिक भार येत असल्याचे खडसे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे. वसुली केल्यावरच बँकेची नुकसान भरपाई भरून निघणार असल्याचे ते म्हणाले आहे.
सीबीआयची अद्याप कार्यवाही नाही
दरम्यान राज्य शासनाकडून राज्यातील बँकेच्या भरती प्रक्रियेसाठी चार एजन्सी देण्यात आल्या आहे. 450 पदे भरण्यात येणार होती. मात्र आर्थिक अडचणी मुळे ते शक्य नसून 232 पदाची भरती करण्यात येणार आहे यामध्ये 250 क्लर्क तर शिपाई 25 अशा प्रकारे जिल्हा मध्यवर्ती बँकेची भरती प्रक्रिया पार पडणार आहे.जिल्हा बँक नोटा बदली प्रकरणात अद्याप पर्यत कोणत्याही कर्मचारी, अधिकार्यावर कार्यवाही करण्यात आलेली नाही. सीबीआयच्या वतीने कोणताही अहवाल बँकेला प्राप्त झाला नसून यामुळे कार्यवाही शक्य नसल्याचे जिल्हा बँक अध्यक्ष रोहिणी खडसे खेवलकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे. सीबीआय च्या माध्यमातून चौकशी सुरु आहे. जे दोषी असतील त्यांना पाठही घालण्याचे काम नसल्याचे माजी मंत्री एकनाथ खडसे म्हटले.