शहादा : तालुक्यातील जि.प. केंद्र शाळा, डोंगरगाव येथे केंद्रा अंतर्गत सर्व जि.प. शाळा, माध्यमिक शाळा व आश्रमशाळेतील शिक्षकांची शिक्षण परिषद आयोजित करण्यात आली परिषदेच्या अध्यक्षस्थानी शिक्षण विस्तार अधिकारी ममता पटेल होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. वनमाला पवार ,जेष्ठ अधिव्याख्याता डायट, नंदुरबार ह्या उपस्थित होत्या. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विषयांवर परिषदेत चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले.मागील शिक्षण परिषदेच्या मागोवा – सदर विषयासंदर्भात केंद्रप्रमुख एस. एस. अहिरे यांनी डायटने पुरवलेल्या पीपीटी द्वारे सर्व मुद्यांना अनुसरून चर्चा केली. याच अनुषंगाने मागोवा संदर्भात डॉ वनमाला पवार मॅडम यांनी पीपीटी अंतर्गत नव्याने समावेश असलेला मुद्दा म्हणजे परिषदेत झालेल्या विषयांची अमलबजावणी शाळा भेटी दरम्यान होत आहेत किंवा नाही व त्याचे प्रातिनिधिक स्वरूपात सादरीकरण घेणे संदर्भात अनमोल मार्गदर्शन केले. एफएलएन अध्ययन स्तर विश्लेषण या विषयासंदर्भात केंद्रप्रमुख एस. एस. अहिरे यांनी शाळा निहाय स्तर निश्चीती केल्यानंतर शाळांची स्तरनिहाय विद्यार्थी सद्यस्थितीचा व एकंदरीत केंद्राचा आढावा सादर केला व विद्यार्थ्यांचे अध्ययन स्तर उंचावण्यासाठी प्रत्येक शिक्षकाने भाषा, गणित विषयाचे किमान १ उपक्रम घेणे बाबत सूचित केले तसेच स्थलांतरित विद्यार्थी सर्वेक्षण पी एमश्री योजनेची शाळांनी लिंक भरावी असे सांगितले सावखेडा शाळेचे मुख्याध्यापक सदाशिव पाटील यांनी आपल्या शाळेतील विद्यार्थी सद्यस्थिती व पुढे त्यासाठी घेण्यात येणारे उपक्रम याविषयी सखोल माहिती सांगितली.
नवोपक्रम लेखन- या विषयाच्या अनुषंगाने माहे ऑक्टोबर २०२३ या महिन्यात शिक्षकांसाठी नवोपक्रम स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असून जास्तीत-जास्त शिक्षकांनी स्पर्धेत सहभागी व्हावे याबाबत डॉ वनमाला पवार यांनी उपस्थिती शिक्षकांना आवाहन केले ,कवठळ शाळेचे शिक्षक जगन दशरथ पावरा,यांनी त्यांच्या शाळेत सुरु असलेला गृह अभ्यास या उपक्रमाची माहिती दिली व त्यात विद्यार्थ्यांनी घरी अभ्यास करत असल्याचे स्वत: तयार केलेला व्हिडिओ केंद्रातील सर्व शिक्षकासमोर दाखवले व अशा प्रकारे विद्यार्थ्यांना घरी देखील अभ्यास करण्याची सवय लागावी, गोडी वाढावी यासाठी केलेले प्रयत्न वाखण्याजोगे दिसून आले. यात प्रतिभा जाधव, शुभांगी माळी, उज्वला पाटील यांनी त्यांच्या वर्गात राबवत असलेल्या उपक्रमाबाबत माहिती दिली.Using Role-Play in Lession – या विषयाचे संदर्भात मार्गदर्शन करताना Co-ordinator राहुल पाटील, मोहिदे त.श. यांनी PPT द्वारा Role-Play किती महत्वाचा आहे हे विषद केले. तसेच विविध Role-Play उपस्थित शिक्षकांना PPT तील उदाहरणाद्वारे पटवून दिले आप-आपल्या वर्गातील विद्यार्थी सुद्धा असे Role-Play करतील असे आवाहन केले.
अध्ययन निष्पत्तीच्या अनुषंगाने शैक्षणिक साहित्य परिणामकारक वापर- या विषयाच्या संदर्भात सोनवद त.श. शाळेचे शिक्षक योगेश रामदास पुंडे,यांनी भाषा विषयाच्या शैक्षणिक साहित्य पेटीतील विविध प्रकारच्या 5 साहित्याची ओळख व त्यांचा वापर आणि महत्व याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले व अध्ययन-अध्यापनात शैक्षणिक साहित्याचा वापर किती महत्वाचा आहे हे विषद केले.आदर्श पाठ – यात राजेंद्र ढोमन धनगर, विषय शिक्षक यांनी उत्कृष्ट असे पाठ सादरीकरण केले.. शेवटी पदोन्नती मुख्याध्यापक राजेंद्र ठाकरे यांनी उपस्थितांचे आभार मानले व राष्ट्रगीताने परिषदेची सांगता करण्यात आली.