चाळीसगाव। केंद्रसरकारने विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती कपात करण्यासंदर्भात घेतलेला निर्णय तात्काळ रद्द करावा याबाबत राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेतर्फे चाळीसगांव नायब तहसिलदार विशाल सोनवणे यांना निवेदन देण्यात आले. केंद्र सरकारतर्फे देण्यात येणार्या इतर मागासवर्गीय (ओ. बी. सी.) संवर्गातील विद्यार्थ्यांना मिळणार्या शिष्यवृत्तीत अचानक कपात करण्यात आली आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
असे होतेय विद्यार्थ्यांचे नुकसान
इतर मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरीता केंद्रसरकार मार्फत 500 कोटी रुपये शिष्यवृत्ती मंजुर करण्यात येत होती. परंतु 500 कोटी वरुन ही रक्कम 54 कोटी रुपये करण्यात आली व वैद्यकिय प्रवेशातील आरक्षण 27% आरक्षणावरून 2% करण्यात आले आहे. या निर्णयाने बहुसंख्य असलेल्या ओ.बी.सी. प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. दोन्ही निर्णय अन्यायकारक असल्याने ते तात्काळ रद्द करुन विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्याकरिता प्रशासकीय स्तरावर पाठपुरावा करावा व मागणी वरिष्ठस्तरापर्यंत पोहचवावी अशी मागणी निवेदनकर्त्यांनी केली. इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना वैद्यकिय अभ्यासक्रमासाठी मिळणार्या प्रवेशाचे आरक्षणही कमी केले आहे. यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे तालुकाध्यक्ष यज्ञेश बाविस्कर, शुभम पवार, प्रज्वल देशमुख, कौस्तुभ राजपुत, गणेश महाजन, प्रणल पवार, एजाज सैयद, प्रदीप पाटील, हर्षल जठार, चैतन्य देशमुख, मुकेश राजपुत, शुभम पाटील, शुभम महाजन, अभिजित ठोके आदी उपस्थित होते.