नवी दिल्ली – माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधींच्या हत्या प्रकरणात केंद्र सरकारने एक प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. यामध्ये हत्या करणाऱ्या दोषींना सोडण्याची तामिळनाडू सरकारची विनंती केंद्राने फेटाळली आहे. दोषींना सोडल्यास धोकादायक परंपरेचा जन्म होईल, असे केंद्र सरकारने म्हटले आहे.
केंद्र सरकारने या प्रतिज्ञापत्रात म्हटले, की न्यायपालिका आणि कार्यपालिकेने या संबंधात विचार विनिमय करून हा निर्णय घेतला आहे. दोषींना सोडले तर आंतरराष्ट्रीय पातळीवर चुकीचा संदेश जाईल.तामिळनाडू सरकारने २०१६ मध्ये सर्वोच्च न्यायलयाला पत्र लिहून दोषींना सोडण्याची विनंती केली होती. न्यायालयाने सातही दोषींना सोडता येईल का, असा सवाल केंद्र सरकारला केला होता. मात्र, सरकारने प्रतिज्ञापत्र दाखल करत तामिळनाडूची मागणी फेटाळली.