माजी मंत्री एकनाथराव खडसे ; मुक्ताईगरात बुथ प्रमुखांची बैठक
मुक्ताईनगर- केंद्र व राज्य शासन विविध जनकल्याणकारी योजना राबवित असून विकासकामे करीत आहे. या योजना आणि विकास कामे पक्षाच्या माध्यमातून समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचवा पात्र व्यक्तींना योजनांचा लाभ मिळवुन द्या, आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकाच्या दृष्टीने आपल्या तालुक्यात पक्ष संघटन मजबूत करा, असे आवाहन माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी केले. मुक्ताईनगर तालुका बुथ प्रमुख आणि पक्ष पदाधिकार्यांची बैठकीत ते बोलत होते. सध्या देशात राफेल प्रकरण गाजत असून विरोधक पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाच्या नेत्यांवर टिका करत आहेत विरोधकांना त्यांच्या भाषेत उत्तर द्या जनतेला सरकारचे विकास कामे समजावून सांगा, असे आवाहनही त्यांनी केले.
यांची होती उपस्थिती
खासदार रक्षा खडसे, बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाचे संयोजक डॉ.राजेंद्र फडके, जिल्हा परीषदेचे माजी अध्यक्ष अशोक कांडेलकर, भाजपा जिल्हा संघटन सरचिटणीस प्रा.सुनील नेवे, बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष विलास धायडे, राजू माळी, भाजपा विधानसभा क्षेत्रप्रमुख रमेश ढोले, तालुकाध्यक्ष दशरथ कांडेलकर, शहराध्यक्ष मनोज तळेले, पंचायत समिती सभापती शुभांगी भोलाने, नगराध्यक्ष नजमा तडवी, उपनगराध्यक्ष मनीषा पाटील, जिल्हा परीषद सदस्य निलेश पाटील, जयपाल बोदडे, वैशाली तायडे, वनिता गवळे, पंचायत समिती सदस्य विकास पाटील, राजू सवळे, सुवर्णा साळुंखे, माजी तालुकाध्यक्ष किशोर पाटील, रमेश पाटील, सरचिटणीस संदीप देशमुख, डॉ.बी.सी.महाजन, भाजयुमो तालुकाध्यक्ष अंकुश चौधरी, योगेश कोलते, पांडुरंग नाफडे आदी प्रमुख उपस्थित होते. संदीप देशमुख यांनी सूत्रसंचलन केले