धुळे : गतवर्षी महाड येथील पत्रकार परीषदेत मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी धुळे शहरात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात शिवसैनिकांकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे धुळे न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
राणे यांना दिलासा
या गुन्ह्यासंदर्भात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे वकील अॅड.अनिकेत उज्वल निकम यांच्याकडून धुळे सत्र न्यायालयात बुधवार, 4 मे रोजी अटक पूर्व जामीन प्रकरणी अर्ज दाखल करण्यात आला होता. मंगळवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.एच.मोहंमद यांनी नारायण राणे यांना अटक पूर्व जामीन मंजूर केला.