जळगाव। केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले रविवारी हावडा-अहमदाबाद एक्सप्रेसने सकाळी 2.22 वाजता जळगाव रेल्वे स्टेशनवर उतरल्यानंतर शासकीय वाहनाने अजिंठा शासकीय विश्रामगृह येथे येत असून सकाळी 8.30 वाजता चोपड्याकडे प्रयाण होणार असून अरुणभाई गुजराथी यांच्या अमृतमहोत्सवी सत्कार सोहळ्याला उपस्थिती व नंतर 12 वाजेपर्यंत त्यांचा वेळ चोपड्याच्या शासकीय विश्रामगृहात राखीव आहे नंतर चोपडा येथून शासकीय वाहनाने मुरबाड( जि. ठाणे)कडे प्रयाण करतील. जिल्हाभरातील रिपाइंच्या सर्व तालुका अध्यक्ष व कार्यकर्त्यांनी सोमवारी सकाळी 8 वाजता उपस्थितीचे आवाहन केले आहे.