केंद्रीय मंत्र्याच्या पीएची आत्महत्या

0

नवी दिल्ली-दक्षिण दिल्लीतील लक्ष्मीबाई नगर येथे केंद्रीय ग्रामीण विकास, पंचायत राज, स्वच्छता आणि पेयजय मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या स्वीय सहायकाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. कुंदन कुमार असे आत्महत्या केलेल्या पीएचे नाव आहे.

सरोजिनी नगर पोलीस ठाण्यात एका व्यक्तीने गळफास घेतल्याचा फोन आला होता. जखमी अवस्थेत कुंदन कुमारला सफदरजंग रूग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ३१ वर्षीय कुंदन पत्नी आणि सहा महिन्यांच्या मुलासह लक्ष्मीबाई नगर येथे राहत होता. तो मुळचा बिहारचा रहिवासी आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांकडे सोपवण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.