नवी दिल्ली । अरविंद केजरीवाल आणि ‘आम आदमी पार्टी’ सध्या चर्चेत आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपांनी सध्या सगळीकडे अरविंद केजरीवाल यांची चर्चा होतेय. आता त्यांच्या बचावासाठी त्यांच्या पत्नी मैदानात उतरल्या आहेत. यासाठी त्यांनी ट्विटरचा मार्ग अवलंबलाय. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी अरविंद केजरीवाल यांचा फक्त बचावच केलेला नाही, तर अरविंद केजरीवालांवर 2 कोटी स्वीकारल्याच्या आरोप करणार्या कपिल शर्मा यांना कोपरखळीही मारली आहे.
‘माझ्या घरात दोन कोटी आले हे मला कळलेच नाही आणि हे पाहायला तुम्ही (कपिल मिश्रा) तरी आमच्या घरी केव्हा आलात? मला तुम्ही आधी सांगितले असतेत तर तुमच्यासाठी चहा तरी केला असता’ असे म्हणत त्यांनी कपिल मिश्रांना कोपरखळी देत त्यांच्या आरोपांचे एकप्रकारे खंडनच केले आहे.
शाब्दिक युद्ध खेळणार नाही
‘सुनिता केजरीवाल यांना त्यांचा नवरा काय कृत्य करतो आहे हे माहीत नसल्याचे म्हटले आहे. पण, आपण सुनिता केजरीवाल यांच्याशी शाब्दिक युद्ध खेळणार नाही. – कपिल मिश्रा