नवी दिल्ली : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सुरु केलेल्या आंदोलनाला देशीतील चार राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी पाठिंबा दिला आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. आज नीती आयोगाची बैठक असून या बैठकीला सर्व मुख्यमंत्री आमंत्रित आहे. यावेळी हे चार मुख्यमंत्री देखील उपस्थित होते. यावेळी त्यांनी मोदींची भेट घेतली.
दरम्यान, या चारही मुख्यमंत्र्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या धरणे आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी राजभवनात त्यांची भेट घेण्याचे ठरविले होते. त्यांनी त्यांनी त्यासाठी नायब राज्यपाल अनिल बैजल यांना तसे पत्रही लिहिले. मात्र त्यांना केजरीवाल यांची भेट घेण्यास राज्यपालांनी नकार दिला. त्यामुळे या चारही मुख्यमंत्र्यांनी केजरीवाल यांची भेट घेतली नाही.
राजकीय चर्चांना उधाण
Delhi: PM Narendra Modi with Karnataka CM HD Kumaraswamy, Andhra Pradesh CM N Chandrababu Naidu, West Bengal CM Mamata Banerjee and Kerala CM Pinarayi Vijayan on sidelines of NITI Aayog Governing Council meeting pic.twitter.com/4yIG1tGz7C
— ANI (@ANI) June 17, 2018
कर्नाटक, केरळ, पश्चिम बंगाल आणि तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची शनिवारी दिल्लीच्या आंध्र प्रदेश भवनामध्ये बैठक झाली. हे सर्व मुख्यमंत्री निती आयोगाच्या बैठकीसाठी आले होते. मात्र, केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू अचानक भेटल्यामुळे राजधानी दिल्लीमध्ये तर्कवितर्क सुरू झाले आहेत.