केजरीवाल यांच्या डोळ्यात फेकली मिरची पावडर; सुरक्षा रक्षकांकडून संबंधित ताब्यात

0

नवी दिल्ली-दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पुन्हा एकदा मोठ्या विरोधाचा सामना करावा लागला आहे. सचिवालयात येत एका व्यक्तीने त्यांच्यावर मिरची पावडर फेकल्याची घटना घडली आहे. केजरीवाल यांच्या डोळ्यात मिरची पावडर गेली आहे. यावर मुख्यमंत्री केजरीवाल पत्रकार परिषद घेणार आहे. त्यात ते पूर्ण माहिती देणार आहे. अनिल शर्मा नावाची ही व्यक्ती असल्याचे बोलले जात आहे.

भाजपकडून निषेध  

अनिल वर्माला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. भारतीय जनता पक्षाने या घटनेबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. भाजप नेता विजेंद्र गुप्त यांनी लोकशाहीत अशा घटनेला कोणतीही जागा नाही असे विधान केले आहे. आरोपीवर कारवाई व्हावी अशी मागणी देखील भाजपने केली आहे.

आप नेत्या अलका लांबा यांनी यांनी हे कट असल्याचे सांगितले आहे.