केजरीवाल यांच्या मुलीच्या अपहरणाची धमकी देणाऱ्या युवकाला अटक !

0

नवी दिल्ली- दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांच्या मुलीच्या अपहरणाची धमकी देणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बिहार येथील मोतीहारी येथील विकास नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. रायबरेलीतून त्याला अटक करण्यात आली आहे.

विकास हा दिल्लीत राहुल एसएससी परीक्षेची तयारी करीत होता. ९ जानेवारीला मुख्यमंत्री कार्यालयाच्या ई-मेलवर धमकी देण्यात आली होती. अरविंद केजरीवाल यांची मुलगी हर्षिता ही एका कंपनीत नोकरी करते.