जळगाव। केरळ राज्यातील काँगे्रस नेत्यांनी तसेच कार्यकर्त्यांनी भररस्त्यात गोहत्या करून शासनाचा निषेध केला होता. परंतू गोहत्या केल्याने हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या असून या काँग्रेसच्या नेत्या व कार्यकर्त्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात येवून कठोर कारवाई करण्यात यावी अश्या मागणीचे निवेदन पोलिस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांना शुक्रवारी देण्यात आले. यावेळी निवेदनात म्हटले आहे की, भारत सरकाने गो-हत्येबाबत जे धोरण घेतले आहे. त्याचा निषेध मिळून केरळ राज्यातील काँग्रेस पक्षाच्या राजकीय नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी भररस्त्यावर गोहत्या करून गो-मांस भक्षण करत शासनाचा निषेध व्यक्त केला.
यांची होती उपस्थिती…
या कृत्यामुळे अनेक हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या आहे. तर गायीला देवीदेवतांच्या काळापासून गोमाता मानली जाते. तर भगवदगीतेतही गायीला महत्व आहे. तरी देखील फक्त मतांच्या राजकारणासाठी गो मातेची भररस्त्यात कत्तल करून शासनाचा निषेध करून काँगे्रस पक्षाच्या नेत्यांमुळे हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांना कारवाईचे निवेदन देतांना मोहन तिवारी, निरंजन चौधरी नगरसेवक सुनिल माळी, मगला बारी, निलुताई इंगळे, राजु नन्नवरे, भगवान सोनवणे, समाधान पाटील, निलेश सपकाळे, भैय्या तायडे, शुभम तायडे, गजानन तांबट, अविनाश चव्हाण, साजन पाटील, रत्नाताई अत्तरदे, रवी सपकाळे, उमेश पाटील, प्रशांत जुवेकर, नितीन चौधरी आदी उपस्थित होते. यानंतर या प्रकरणाची माहिती घेवून तक्रार दाखल करता असे आश्वासन पोलिस अधीक्षक यांनी निवेदनकर्त्याना दिले.