तहसीलदारांसह निरीक्षकांना निवेदनाद्वारे केरळात जाण्याची मागितली परवानगी
मुक्ताईनगर- केरळ येथे झालेल्या मुसळधार पावसाने 14 जिल्हे हे पूरग्रस्त बाधीत झालेले आहेत त्याठिकाणी मदतीसाठी जाण्याकरीता मुक्ताईनगर तालुक्यातील समस्त पोलीस पाटलांनी एक आदर्श पायंडा रचत शुक्रवारी मुक्ताईनगर तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना केरळ जाण्याची परवानगी मिळावी, असे निवेदन दिले आहे.
निवेदनाद्वारे मागितली केरळात जाण्याची परवानगी
केरळ राज्यात झालेल्या मुसळधार पावसाने 14 जिल्हे पूरग्रस्त झाले आहे याठिकाणी परिस्थिती आवाक्याबाहेर झाल्याने याठिकाणी सेनेचे जवान तसेच डॉक्टर हे आपापल्या परीने होईल तशी मदत करीत आहेत. आपण या देशाचे नागरिक आहोत व मनुष्य धर्म हा सर्वात मोठा धर्म असल्याने तसेच आपल्याने होईल तशी मदत या ठिकाणी जाऊन मुक्ताईनगर तालुक्यातील समस्त पोलीस पाटील करण्याचा हा छोटासा प्रयत्न करीत आहे. या ठिकाणी मदतीचे हात हे जास्त प्रमाणात पाहिजे तसेच वेगवेगळ्या राज्यातून मदतीसाठी निधी उपलब्ध होत आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील पोलीस पाटलांनी एक वेगळा पायंडा रचत शुक्रवारी तहसीलदार मनोज देशमुख व पोलीस निरीक्षक अशोक कडलग यांना निवेदनाद्वारे केरळ येथील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जाण्याकरिता परवानगी मागितली आहे.
यांची होती उपस्थिती
निवेदन देतेवेळी पोलिस पाटील संघटनेचे मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष दीपक चौधरी, कार्याध्यक्ष कैलास बेलदार, सचिव दिलीप पाटील, सहसचिव जितेंद्र पाटील, प्रसिद्धी प्रमुख भूषण चौधरी, जळगाव जिल्हा सदस्य स्नेहल काळे, महेश पाटील, विजय पाटील, कैलास वाघ, विनोद हिरोळे, संजय चौधरी, सचिन पाटील, विनोद पाटील व तालुक्यातील कार्यकारणी सदस्य व पोलीस पाटील आदी उपस्थित होते.