केरळात एकदा तरी येऊन वातावरण अनुभवायला हवं – विराट कोहली

0

तिरुअनंतपुरम : केरळात येणं अत्यंत आनंददायी असतं. मला केरळात यायला खूप आवडतं आणि या परिसरातील सकारात्मक उर्जा खूप आवडते. केरळाचं सौंदर्य पाहता येत नाही तर अनुभवावं लागतं. प्रत्येकाने केरळात एकदा तरी येऊन येथील वातावरण अनुभवायला हवं . हे राज्य फिरण्यासाठी आणि राहण्यासाठी अत्यंत सुरक्षित आहे.’असं मत कर्णधार विराट कोहली याने व्यक्त केलं आहे. भारत वि वेस्ट इंडिजच्या पाचव्या आणि शेवटच्या वनडे सामन्यासाठी भारतीय संघ तिरुअनंतपुरममध्ये एका रिसॉर्टमध्ये उतरला आहे.

भारत वि वेस्ट इंडिजमधील पाचव्या वनडे सामन्यासाठी भारतीय संघाचं केरळची राजधानी तिरुअनंतपुरम येथे आगमन झालं आहे. इथे एका सुंदर रिसॉर्टमध्ये संघाची राहण्याची सोय करण्यात आली आहे. या रिसॉर्टच्या पाहुणचारामुळे विराट इतका खुश झाला की केरळ आणि त्याच्या संस्कृतीचं कौतुक करणारा अभिप्राय विराटने हॉटेलच्या व्हिजीटर्स बुकमध्ये लिहिला आहे. केरळ हे राज्य शांत, निरामय आणि फिरण्यासाठी अत्यंत सुरक्षित असल्याचही कोहलीने म्हंटले आहे. भारत वि. वेस्ट इंडिजच्या या मालिकेत भारताने २-१ने आघाडी मिळवली आहे. आता या अंतिम सामन्याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे.