केळगाव जि. प. प्राथमिक शाळेत टॅब वाटप

0

हैद्राबाद येथील नंदी फाउंडेशनने राबविला उपक्रम

चिंबळी : केळगाव (ता. खेड) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थिनींना ’नन्ही कली’ या उपक्रमांतर्गत नंदी फाउंडेशन (हैद्राबाद) या संस्थेच्या वतीने मोफत टॅब वाटप करण्यात आले, अशी माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता काशिद यांनी दिली. विद्यार्थिनींना शिक्षणाची गोडी लागावी, या उद्देशाने नंदी फाउंडेशनने हा उपक्रम राबविला. हातात टॅब मिळाल्याने विद्यार्थिनींच्या चेहर्‍यावर आनंद दिसून येत होता.

यांची होती उपस्थिती
या उपक्रमाला नगरसेवक सतीश म्हस्के, पूनम सुतार, सरपंच सोनाली मुंगसे, उपसरपंच माऊली मुंगसे, डॉ. मुकुंदराव सोनवणे, सुरेश मुंगसे, ग्रामपंचायत सदस्य नामदेव मुंगसे, संतोष गुंड, गणेश सोनवणे, रोहिदास मुंगसे, शिवाजी मुंगसे, सुदाम गुंड, सुभाष सोनवणे, ग्रामपंचायत सदस्या विठाबाई गुंड, युवराज सोनवणे, नंदी फाउंडेशनच्या प्रकल्प अधिकारी अंजना घोजणे, रेश्मा गायकवाड, वंदना भाकरे, उषा मुंगसे, दत्तात्रय मुंगसे, दत्तात्रय झिरपे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक सुभाष सोनवणे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद चव्हाण यांनी केले.