रावेर – रावेर तालुक्यात केळी बोर्ड भावापेक्षा कमी भावाने केळी मागणी होत असल्याने १८ रोजी सकाळी ११ वाजता येथील कृषी उपन्न बाजार समितीत महत्वाची बैठक बोलविण्यात आली आहे. तालुक्यात केळीचे पिकाची सर्वाधिक लागवड केली जाते.
केळी शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यासाठी कृषी बोर्ड असुन त्यांच्या भावावर आधारीत व्यापारी शेतक-यांकडून केळी घेतली जाते परंतु तालुक्यात काही व्यापारी बोर्ड भावापेक्षा कमी दरात माल घेत असल्याने यावर चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली आहे. बैठकीला जास्तीत-जास्त संखेने उपस्थित राहण्याचे आवाहन कृषी उपन्न बाजार समितीचे सभापती निळकंठ चौधरी, उपसभापती अरुण पाटील व संचालक मंडळातर्फे करण्यात आले आहे.